भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेदां जन्मस्थान शास्त्रां समाधान । काय बुझावण दाखविसी

vedan janmasthan shastran samadhan | kay bujhavan dakhavisi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वेदां जन्मस्थान शास्त्रां समाधान । काय बुझावण दाखविसी ॥१॥ जगादि अनंत अवतार घेसी । चरित्रें दाविसी भक्तांपुढें ॥२॥ पतीतपावन तूंचि नारायण । सत्वर धावणें दामो-दरा ॥३॥ नामा म्हणे भवबंधविमोचका । वैकुंठ नायका पांडुरंगा ॥४॥