भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेदाचें हें सार वैराग्याचें जीवन । चिदाकाशींची खूण परम गुज

vedachen hen sar vairagyachen jivan | chidakashinchi khun param guj

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वेदाचें हें सार वैराग्याचें जीवन । चिदाकाशींची खूण परम गुज ॥१॥ जें शुद्धज्ञान गुह्य मोक्षमुक्ति बीज । सकळ मंत्रराज मंगलानिधी ॥२॥ तें या नामयाचें होतें ह्रदयकमळीं । कथां भूमंडळीं प्रकट केली ॥३॥ तें हें विठठनाम साराचेम पैं सार । कलियुगी उद्धार सकळ जनां ॥४॥ जें श्रवणाचें श्रवण मननाचें मनन । जें निजध्यासन निजध्यासाचें ॥५॥ जें विचाराचें सार वृत्तीचा निर्धार । स्वरुप साक्षात्कार उघडा केला ॥६॥ जें भक्तीचें सौभाग्य ज्ञानाचेम आरोग्य । शास्त्राचें तें चांग मथित नाम ॥७॥ नामापरतें थोर नाहीं पैं आणिक । जनांसि तारक हेंचि एक ॥८॥ जें सकळ धर्म जनक पवित्राचें पावन । जें कां अधिष्ठान आनंदाचें ॥९॥ जें योगसिद्धीचें जीवन पीयुष । जेणें पूर्ण आयुष्य कामनेचें ॥१०॥ पुण्यपावन देवा भक्तांचे सोहळे । प्रत्यक्ष गळाले आनंदाचे ॥११॥ भक्तिभावें याचें करितां श्रवण । मग नाहीं दर्शन गर्भवासा ॥१२॥ म्हणोनि कीर्तन करावें आवडी । घ्यावी अर्थगोडी अनुभवें ॥१३॥ नव्हे हें प्राकृत पाठांतर कवित्व । हा उपनिषद मथितार्थ ब्रह्मरस ॥१४॥ जाणीव शहाणीव न करावी सर्वथा । न पहावी योग्यता व्युत्पत्तीची ॥१५॥ हें सात्विकाचें धन भोक्ते संतजन । नामदेवें पूर्ण ग्रंथ केला ॥१६॥