भजनी मालिका
← भजनांकडे परत

वावडी दुरीच्या दुरी उडतसे अंबरीं । हातीं असे दोरी परि लक्ष तेथें

vavadi durichya duri udatase ambarin | hatin ase dori pari laksha tethen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वावडी दुरीच्या दुरी उडतसे अंबरीं । हातीं असे दोरी परि लक्ष तेथें ॥१॥ दुडी वरी दुडी पाण्या निघाली गुजरी । चाले मोकळ्या करीं परी लक्ष तेथें ॥२॥ व्यभिच्यारी नारी परपु-रुष जिव्हारी । वर्ते घरोचारीं परि लक्ष तेथें ॥३॥ तस्कर नगरीं परद्रव्य जिव्हारी । वर्ते घरोघरीं परि लक्ष तेथें ॥४॥ धन लो-भ्यानें धन ठेवियलें दुरी । वर्ते चराचरीं परि लक्ष तेथें ॥५॥ नामा ह्मणे असावें भलतियां व्यापारीम । लक्ष सर्वेश्वरीं ठेऊनियां ॥६॥