भजनी मालिका
← भजनांकडे परत

वारीं वो दशवंती आपुला तूं बाळ । विकटू हा खेळ खेळतसे

varin vo dashavanti apula tun bal | vikatu ha khel khelatase

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वारीं वो दशवंती आपुला तूं बाळ । विकटू हा खेळ खेळतसे ॥१॥ धाकुटिया मुलां घेतो हा चिमोरे । काय करुं धुरे भीत असों ॥२॥ घरींचा म्हातारा हाणितला येणें । काय सांगूं उणें तुजपाशीं ॥३॥ मी वो लटिकी तरी नामयासी पुसा । तुझा बाळू कैसा आसंदत ॥४॥