भजनी मालिका
← भजनांकडे परत

वराईची गोणी कळली राजाईसी । नामा ब्राह्मणांसी बोलाविती

varaichi goni kalali rajaisi | nama brahmanansi bolaviti

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वराईची गोणी कळली राजाईसी । नामा ब्राह्मणांसी बोलाविती ॥१॥ इतक्यामध्यें होन मडकेंभर काढिले । गोणी ते शिविली होती तैसी ॥२॥ द्विज मेळवुनि आला नामदेव । वांटियेलें सर्व द्र्व्य त्यानें ॥३॥ नामा म्हणे द्वव्य ज्याचेंज त्या दिधलें । ऋण तें ठेविलें नाहीं कांहीं ॥४॥ राजाई ते होन राखावया गेली । हातां राख आली कोळशांची ॥५॥ कोळसे देखोनि खोंचियली मनीं । धन्य तुझी करणी पांडुरंगा ॥६॥ नामदेवापुढें सांगे वर्तमान । चोरून म्यां होन ठेविले होते ॥७॥ पाहातां होनांचे जाले हो कोळसे । नामा पाहतां ते जाले सोनें ॥८॥ वांटिले ब्राह्मणां ते होन तयानें । फेडियेलें ऋण गोविंदाचें ॥९॥