भजनी मालिका
← भजनांकडे परत

वांकडे पाहणें जया लौकिकासी । मज पंढरिसी वास पुरे

vankade pahanen jaya laukikasi | maj pandharisi vas pure

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वांकडे पाहणें जया लौकिकासी । मज पंढरिसी वास पुरे ॥१॥ उदंड उपास कासया करावे । पुरे एका भावें भाविकांसी ॥२॥ तीर्थ क्षेत्र मूळ जाणा वाळुवंट । कटीं कर नीट भक्तांसाठीं ॥३॥ नामा म्हणे माझी वैकुंठ पंढरी । तेथें निरंतरी जन्म देंई ॥४॥