भजनी मालिका
← भजनांकडे परत

वंदिली अंबिका निघाले बाहेर । कीर्तन गजर पुढें होत

vandili ambika nighale baher | kirtan gajar pudhen hot

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वंदिली अंबिका निघाले बाहेर । कीर्तन गजर पुढें होत ॥१॥ गोदातीरीं क्षेत्र धन्य त्र्यंबकेश्वर । उतरले भार वैष्णंबांअचे ॥२॥ म्हणती पांडुरंगें दावियेलें स्थळा । निवृत्तिराज विकळ पार जाले ॥३॥ पंचमीचे दिवशीं गेले पंचवटी । उतरले तटीं गौतमीचे ॥४॥ नामाअ म्हणे शेवट केला वनमाळी । रहाती ये स्थळीं निवृत्तिराज ॥५॥