भजनी मालिका
← भजनांकडे परत

वामांगी बाहुली तूर्या दावी कळा । ते लक्षी पाउलां रामरूप

vamangi bahuli turya davi kala | te lakshi paulan ramarup

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वामांगी बाहुली तूर्या दावी कळा । ते लक्षी पाउलां रामरूप ॥१॥ माया निजरूप दक्षिणांनीं वसे । तूर्येचा हा भास मावळला ॥२॥ मी माया म्हणतां पाहे आपणातें ।आत्मा-राम तेथें ज्ञानजळीं ॥३॥ नामा म्हणे ज्ञान माया ते आपण । दृष्टीचें देखणें आत्मरूप ॥४॥