भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैष्णव तो बळी । सदाशिव चंद्रमौळी

vaishnav to bali | sadashiv chandramauli

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वैष्णव तो बळी । सदाशिव चंद्रमौळी ॥१॥ त्याचा भक्त तो रावण । मारुनि छेदिला अभिमान ॥२॥ आणिक तो बाणासूर । छेदिला शिवासमोर ॥३॥ अनिरुद्धा समयीं ख्याती । केली तयाची फजिती ॥४॥ भस्मासुर भस्म जाला । जाळुनियां भस्म केला ॥५॥ मारुनियां मुक्त केलें । परि ते भक्त नाहीं जाले ॥६॥ नामा म्हणे देवाधिदेव । भजावया पंढरीराव ॥७॥