भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैराग्य अभिमानें फिरविलें जातें । म्हणवोनी यातें भाव खुंटा

vairagya abhimanen phiravilen jaten | mhanavoni yaten bhav khunta

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वैराग्य अभिमानें फिरविलें जातें । म्हणवोनी यातें भाव खुंटा ॥१॥ संचित मातृका वैरणी घातली । अव्यक्तिं दळिलीं व्यक्ताव्यक्त ॥२॥ नामरूपा आदि दळियेलें सर्व । पीठ भरी देव पंढरीचा ॥३॥ नवल हा देव बैसला दळणीं । नाहीं केली जनी नामयाची ॥४॥