भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैकुंठीं माहें तंव चतुर्भुज दिसे । परि सुंदर रूप तेथें नाहीं

vaikunthin mahen tanv chaturbhuj dise | pari sundar rup tethen nahin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वैकुंठीं माहें तंव चतुर्भुज दिसे । परि सुंदर रूप तेथें नाहीं ॥१॥ क्षीरसागरीं पाहें तों तेथें निद्रिस्त । परि सुंदर रूप तेथें नाहीं ॥२॥ द्वारके पाहें तंव पाताळीं चरण । परि सुंदर रूप तेथें नाहीं ॥३॥ ह्लदयीं पाहें तंव अव्यक्तचि दिसे । परि सुंदर रूप तेथें नाहीं ॥४॥ नामा ह्मणे ऐसा सर्व गुण संपूर्ण । पंढरीये उभा शोभतसे ॥५॥