भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैकुंठ तें घर । सांडूनियां निरंतर

vaikunth ten ghar | sanduniyan nirantar

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वैकुंठ तें घर । सांडूनियां निरंतर ॥१॥ तो हा पुंडलिक द्वारीं । उभा कर कटावरी ॥२॥ क्षीर सांगरींची मूर्ती । तो हा रुक्मि-णीचा पती ॥३॥ नये योगियांचे ध्यानीं । छंदें नाचतो कीर्तनीं ॥४॥ नामा ह्मणे आला । सवें परिवार आणिला ॥५॥