भजनी मालिका
← भजनांकडे परत

वडील कुरंगी काय बोले त्यासी । सांगतें धर्मासी पूर्वीलीया

vadil kurangi kay bole tyasi | sangaten dharmasi purviliya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वडील कुरंगी काय बोले त्यासी । सांगतें धर्मासी पूर्वीलीया ॥१॥ बांधोनी मारितां घडे महादोष । पाजी उदकास सोडोनियां ॥२॥ पुऊनियां जळ येऊं तुजपाशीं । मग सावकासी करीं काज ॥३॥ आमुचा विश्वस नाहीं तुज जरी । मागशीं त्यापरी भाक देऊं ॥४॥ पर उपकारीं पडतसे देह । लोभ आतां काय वांचूनियां ॥५॥ भुकेलिया अन्न तान्हेल्या जीवन । पुण्यासी कारण इतुकेंची ॥६॥ पांचजणीं तुज बोपीयेले देह । यालागीं संदेह न धरावा ॥७॥ नामा ह्मणे ऐसा प्रार्थितां किरात । द्रवला मनांत काय बोले ॥८॥