भजनी मालिका
← भजनांकडे परत

वदनीं तुझें नाम अमृत संजीवनी । असतां चक्रपाणि भय कवण

vadanin tujhen nam amrut sanjivani | asatan chakrapani bhay kavan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वदनीं तुझें नाम अमृत संजीवनी । असतां चक्रपाणि भय कवण ॥१॥ या जन्ममरणाची कायसी मग चिंता । तुझिया शरणागता पंढरीनाथा ॥२॥ ह्रदयीं तुझें रुप बिंबलें साचार । तेथें कवण पार संसाराचा ॥३॥ नामा म्हणे तुझें नाम वेळोवेळ । म्हणतां कळिकाळ पायां पडे ॥४॥