भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाचे नाम गात चालिला तो द्विज । एकाचें तें चोज शुद्ध भावें

vache nam gat chalila to dvij | ekachen ten choj shuddha bhaven

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वाचे नाम गात चालिला तो द्विज । एकाचें तें चोज शुद्ध भावें ॥१॥ जीवशिव एकाकार झाली वृत्ति । नाहीं कांहीं चित्तीं शमदम ॥२॥ हात पाय नळ्या वळती फेंगडया । भावार्थाच्या गुडया उभारीत ॥३॥ नामा म्हणे वाट चालतां समाधि । सोहं स्वरूपीं बुद्धि ठसावली ॥४॥