भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाचे ह्मणतां गंगा गंगा । सकळ पापें जाति भंगा

vache hmanatan ganga ganga | sakal papen jati bhanga

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वाचे ह्मणतां गंगा गंगा । सकळ पापें जाति भंगा ॥१॥ दृष्टी पडतां ब्रह्मगिरि । त्यासि नाहीं यमपुरी ॥२॥ कुशावर्ती करितां स्नान । त्याचें वैकुंठीं राहणें ॥३॥ नामा ह्मणे प्रदक्षिणा । त्यासी जन्म नाहीं पुन्हा ॥४॥