भजनी मालिका
← भजनांकडे परत

उठोनी प्रात:काळीं गौळणी बोलती । जाईल श्रीपती वना आतां

uthoni prat:kalin gaulani bolati | jail shripati vana atan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
उठोनी प्रात:काळीं गौळणी बोलती । जाईल श्रीपती वना आतां ॥१॥ चला जाऊं आतां पाहूं गे श्रीमुख । हरेल ही भूक डोळियांची ॥२॥ तांतडीनें येती नंदाचिया घरा । मुख दावीं उदारा कृष्णराया ॥३॥ कुरळे हे केश सुहास्य वदन । आकर्ण नयन शोभ-ताती ॥४॥ अरुणोदय प्रभा अधरीं दिसती । हिरे झळकती दंत तुझे ॥५॥ भोंवया व्यंकटा सरळ नासिक । पाहोनियां मुख सुख होय ॥६॥ लल्लाटीं शोभत केशराचा टिळा । वर बिंदु रेखिला कस्तु-रीचा ॥७॥ वैजयंती माळा किरीट कुंडलें । नामयानें केलें निंबलोण ॥८॥