भजनी मालिका
← भजनांकडे परत

उठोनि प्रातःकाळीं ओढितां काचोळीं । जातो वेळोवेळीं महाद्वारीं

uthoni pratahkalin odhitan kacholin | jato velovelin mahadvarin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
उठोनि प्रातःकाळीं ओढितां काचोळीं । जातो वेळोवेळीं महाद्वारीं ॥१॥ अहो जी दातारा विनवी अवधारा । तुम्हीं यावें घरां भोजनासी ॥२॥ रखुमाई सांगाते तुम्ही यावें तेथें । सामोग्री सांगातें चालावावी ॥३॥ सडा संमार्जन हें माझें करणें । उदका भरणें सुगंधेंसी ॥४॥ शेणपत्रावळी काढीन उष्टावळी । नित्य वेळोवेळीं हाचि धंदा ॥५॥ नामा म्हणे देवा तुमचें तुम्ही जेवा । प्रसाद तो द्यावा सेवकासी ॥६॥