भजनी मालिका
← भजनांकडे परत

उठिले वै

uthile vai

रचनाकार: संत नामदेव · अभंग
उठिले वै ष्णव घेऊनि नारायणा । चालिले ते स्नाना अवघे जन ॥१॥ गंधा आणि अक्षता विसोबाचे हातीं । पूजा ते करिती सोपानाची ॥२॥ सोपान वटेश्वर सोंवळे जाले सांग । निवृत्ति पांडुरंग पूजियेले ॥३॥ गंधर्व आणि सुरगण पूजिती सोपान । यथाविधी प्रमाण संपादिलें ॥४॥ नामा म्हणे पूजा केली ह्रषिकेशी । चला पारण्याशी अवघे जन ॥५॥