भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपजोनी सभाग्य तेचि एक जाले । जीहीं विचारिलें आत्महित

upajoni sabhagya techi ek jale | jihin vicharilen atmahit

रचनाकार: संत नामदेव · अभंग
उपजोनी सभाग्य तेचि एक जाले । जीहीं विचारिलें आत्महित ॥१॥ सांडोनि मीपणास सद्‌‍गुरुचरणा । लागलों संपूर्ण भावार्थोंसि ॥२॥ तयाचें जें कांहीं सर्व मज वोझें । नाहीं मज दुजें त्यासि कांहीं ॥३॥ तयाचे ह्रदयीं संतपण प्रगटे । द्वैतपण तुटे क्षणामाजीं ॥४॥ नामा म्हणे आम्हां विठोबाचे बोल । सांपडली वोल तरावया ॥५॥