भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपाधि निर्मळ शोभती चरण । नादबिंदु पूर्ण मध्य-भागीं

upadhi nirmal shobhati charan | nadabindu purna madhya-bhagin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
उपाधि निर्मळ शोभती चरण । नादबिंदु पूर्ण मध्य-भागीं ॥१॥ कदंबावरती चढे वनमाळी । शोभती निढळा ऊर्ध्वपुं‍ड्र ॥२॥ श्रवणीं कुंडलें शोभती नक्षत्र । श्रीमुख पवित्र दिसों येत ॥३॥ नामा ह्मणे मज ढापवेना डोळा । करुणा कल्लोळे देखोनियां ॥४॥