भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपदेश विव्हळ न कळे याचा अर्थ । वायांची हा स्वार्थ प्रपंचाचा

upadesh vivhal na kale yacha artha | vayanchi ha svartha prapanchacha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
उपदेश विव्हळ न कळे याचा अर्थ । वायांची हा स्वार्थ प्रपंचाचा ॥१॥ सांडी हा प्रपंच मिथ्या लवलाहो । विठठल हा टाहो नित्य करी ॥२॥ हरी हरी भजन भज दयाशीळ । होसील निर्मळ ब्रह्मरुप ॥३॥ सर्व हा आकार हरीचें शरीर । मायेचा विकार भुलों नका ॥४॥ आप तेजीं ब्रह्म हरी माझा सम । आदि अंतीं नेम विठ्ठल हरी ॥५॥ नामा म्हणे उपमा काय द्यावी यासी । नाम तारी सर्वांसी कलिमाजीं ॥६॥