भजनी मालिका
← भजनांकडे परत

उंसाचे सेजारीं येरंडाचें झाड । नाहीं त्याचा पाड गोडी आली

unsache sejarin yerandachen jhad | nahin tyacha pad godi ali

रचनाकार: संत नामदेव · अभंग
उंसाचे सेजारीं येरंडाचें झाड । नाहीं त्याचा पाड गोडी आली ॥१॥ कर्पुरासी जाला दीपाचा शेजार । काय गुणें सार राहिल त्याचा ॥२॥ सागरीं लवण टाकिलें नेऊन । काय गुण खडेपण उरलें त्याचें ॥३॥ तैसा नामदेव विठोबाच्या जागा । काय गुणें या गा कोरेपण ॥४॥ म्हणे मुक्ताबाई चंदनाचें झाड । अहंतासर्प वेढे गुंडाळिले ॥५॥