भजनी मालिका
← भजनांकडे परत

उडाली पक्षिणी गेली अंतराळीं । चित्त बाळाजवळी ठेवूनियां

udali pakshini geli antaralin | chitta balajavali thevuniyan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
उडाली पक्षिणी गेली अंतराळीं । चित्त बाळाजवळी ठेवूनियां ॥१॥ तैसें माझें मन राहो कां ईश्वरीम । मग सुखें संसारीं असेना का ॥२॥ धेनु चरे वनीं वच्छ असे घरीं । चित्त वच्छावरी ठेवूनियां ॥४॥ विष्णुदास नामा विनवी परोपरी । हें प्रेम श्रीहरी द्यावें मज ॥५॥