भजनी मालिका
← भजनांकडे परत

उचितानुचिता भजे पंढरीनाथा । न बोलें सर्वथा वर्गें तुझीं

uchitanuchita bhaje pandharinatha | na bolen sarvatha vargen tujhin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
उचितानुचिता भजे पंढरीनाथा । न बोलें सर्वथा वर्गें तुझीं ॥१॥ बिभिषणा तुवां दिधली नगरी । कीर्ति चराचरीं वाखा णिती ॥२॥ ध्रुव प्रल्हाद अंबऋषि नारद । हरिश्चंद्र मुचकुंद करोनियां ॥३॥ नामा ह्मणे आतां जन्मजन्मांतरीं । करीन ऋणि हरी तुज आतां ॥४॥