भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्यां चाळविलें अनंत सेवका । तोचि चाळा मज दाविसी निका

tyan chalavilen anant sevaka | tochi chala maj davisi nika

रचनाकार: संत नामदेव · अभंग
त्यां चाळविलें अनंत सेवका । तोचि चाळा मज दाविसी निका ॥१॥ आदि अंतीं तुझ्या जाणितल्या खुणा । आतां काय करिसी पंढरीच्या राण्या ॥२॥ भलारे भला मज जालासि शहाणा । भेष पळविलें शास्त्रपुराणा ॥३॥ नामा म्हणे केशवा मज मारून दवडी । पुढती न धरावि सोय माझी पुढती फुडी ॥४॥