भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्वरें धांवोनियां आलासे गोविंद । सावध सावध नाम-देवा

tvaren dhanvoniyan alase govind | savadh savadh nam-deva

रचनाकार: संत नामदेव · अभंग
त्वरें धांवोनियां आलासे गोविंद । सावध सावध नाम-देवा ॥१॥ रुसलासे नामा देवासी न बोले । करें कुर्वाळिलें वदन तेव्हां ॥२॥ समजावूनि देवें धरिला पोटीसीं । बोलें मजपाशीं नामदेवा ॥३॥ नामा ह्मणे देवा उशीर कां केला । किंवा माझा आला तुला राग ॥४॥