भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुवां येथें यावेम कीं मज तेथें न्यावें । खंती माझ्या जीवें मांडियेली

tuvan yethen yavem kin maj tethen nyaven | khanti majhya jiven mandiyeli

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुवां येथें यावेम कीं मज तेथें न्यावें । खंती माझ्या जीवें मांडियेली ॥१॥ माझें तुजविण येथें नाहीं कोणी । विचारावें मनीं पांडुरंगा ॥२॥ नामा म्हणे वेगीं यावें करुणाघना । जातो माझा प्राण तुजलागीं ॥३॥