भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुटकें संचित जालें शुद्ध चित्त

tutaken sanchit jalen shuddha chitta

रचनाकार: बहिणाबाई · अभंग
तुटकें संचित जालें शुद्ध चित्त । अंतरींचा हेत ओळखिला ॥ १ ॥ कृपा केली देवें इंद्रायणीतीरीं । देहुग्रामीं थोर भक्तिपंथ ॥ २ ॥ तेथें पांडुरंग देवाचें देऊळ । राहावया स्थळ प्राप्त झालें ॥ ३ ॥ तुकाराम संत संताचें कीर्तन । तिन्ही काळ तीन दृष्टीपुढें ॥ ४ ॥ नमस्कार तया न घडे पतिभयें । परि चित्त राहे सदा पायीं ॥ ५ ॥ बहिणी म्हणे ऐसे मास झाले सात । अवघेंची संचीत सरो आलें ॥ ६ ॥