भजनी मालिका
← भजनांकडे परत

तूं माय माउली आस केली थोरी । वास निरंतरीं पंढरिये

tun may mauli as keli thori | vas nirantarin pandhariye

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तूं माय माउली आस केली थोरी । वास निरंतरीं पंढरिये ॥१॥ स्वरूप दाखवी एक वेळां मज । धरूं नको लाज पांडुरंगा ॥२॥ नामा म्हणे तुज भक्तिचिये पैं पिसें । पुरविसी आस दुर्बळाची ॥३॥