भजनी मालिका
← भजनांकडे परत

तूं जाऊं नको जेथें तेथें । जरी तुज मुक्तीचें आर्तें । तुज मी सांगेम हित । देऊनि चित्त परियेसें

tun jaun nako jethen tethen | jari tuj muktichen arten | tuj mi sangem hit | deuni chitta pariyesen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तूं जाऊं नको जेथें तेथें । जरी तुज मुक्तीचें आर्तें । तुज मी सांगेम हित । देऊनि चित्त परियेसें ॥१॥ शंभु अडसष्टी तीर्थांचेम माहेर । सकळ सिद्धि ऋषीश्वर । मध्यान्हकाळीं सुरवर । पंढरपूर ठाकती ॥२॥ जाई जांई आलियारे । पांडुरंगीं राहें स्थिररे । न लगती आणिक दैवतें रे । एक पुरे विठ्ठलची ॥३॥ तीर्थ क्षेत्र दैवतें । ऐसें नाही जेथे तेथें । तिन्ही सर्वोत्तम जेथें । तें पैं क्षेत्र सांगेन ॥४॥ श्रीहरीच्या चोविस मूर्ति । विठ्ठल प्रेमदृष्टीं प्रीति । सहस्त्र नामांवरती कीर्ती । विठठल दैवत जाणावें ॥५॥ रुद्रार्धांगी गौरी । जान्हवी असे शिरीं । सर्वांग व्यापिनी भीमा सुंदरी । आले त्रिपुरारी ठाकोनी ॥६॥ कोटिजन्माचें पातक । नासे स्नान केलिया देख । एवढें क्षेत्र अलैकिक । पांडुरंग भींवरा ॥७॥ काशीं त्यागिजे शरीर । हिंवे शिणलें केदार । पाणी गोमतीचें क्षार । म्हणवोनि महिमा सम नाहीं ॥८॥ जन्म मरणावेगळें । वैकुंठ तुकिलें सगळें । परि त्याहूनि आगळें । एक अक्षर जाणावें ॥९॥ गया भोंवुनि चौ-दापदीं । तीं अनंतें वेणुनादीं । काला केला गोविंदीं । हा दृष्टांत पहा पां ॥१०॥ ज्याचेनि नांवें पिंडदान । त्यासी गयेसी गति जाण । येथें करितां नाम स्मरण । सर्व पूर्वजां मुक्ती ॥११॥ कार्ति-कीये आदित्यवारीं । जो पद्माला स्नान करी ! त्यासी नाहेम येरझारी । नये पुढती संसारा ॥१२॥ इंद्र येवढे परमेष्टी । तेथें मनुष्याच्या काय गोष्टी । धन्य धन्य तो एक सृष्टीं । पंढरी दृष्टीं जो देखे ॥१३॥ बरवें पुंडलीकें केलें । हें परब्रह्म रे अर्चिलें । जगांत शांतवन केलें । परि नेटकें सर्वथा ॥१४॥ तीर्थ सोपारें सधर । कष्ट न लगती अपार । उपवासी निराहार । कीं क्षौर करणोंचि नलगे ॥१५॥ येथें सुखें येणें जाणें । घेणें नलगे धरणें । मनीचें मनोरथ पुरवणें । एके भेटीसाठीं ॥१६॥ पूर्वजन्मींचा तापसी । तीर्थें केलीं पुण्यराशीं । सहस्त्र शतें भोजनासी । देवां द्विजां भजिन्नला ॥१७॥ शाळिग्रामाची पूजा करी । त्यासी प्रसन्न झाले हरि । त्यसी दावितो पंढरी । पूर्व सं-स्कारी ह्मणोनियां ॥१८॥ जयासी नावडे पंढरी । तो पापिया दुरा-चारी । उपजोनियां संसारीं । येरझारीं । शिणतो ॥१९॥ त्यासी श्वान सूकर हांसती । ह्मणती यासी कैसी पडली भ्रांती । उपजो-नियां मनुष्ययातीं । पंढरपूरपति नोळखे ॥२०॥ जो विन्मुख पंढ-रपुरा । त्याचा संग झणीं धरा । मोडोनि सुकृताचा थारा । पाप शरीरासी तो गेल ॥२१॥ जो पंढरीसी आर्तु । त्याची करा बरवी मातु । अंतकाळीं पंढरीनाथु । यमपंथु चुकवील ॥२२॥ बरवें सम-तुल्य वाळुवंत । वरी वैष्णव मिळाले घनदाट । करिती हरिनामाचे बोभाट । वीर उद्भट विठ्ठालचे ॥२३॥ जे येथें प्रेमासी आतुर । ते चतुर्भुज होती नर । येवढें क्षेत्र पंढरपुर । महिमा थोर तिहीं लोकीं ॥२४॥ अन्य क्षेत्रीं पाप कीजे । तें पुण्य क्षेत्रीं विनसिजे । पुण्य क्षेत्रीं पाप कीजे । तें त्यागिजे पंढरीसी ॥२५॥ पंढरीचें पातक । पंढ-रीस नासे देख । ऐवढें क्षेत्र अलौकिक । त्रिभुवनामाझारी ॥२६॥ पैल इटेवरी सांवळा । विठोबा पहा पहा रे डोळां । विघ्न घालोनि पायातळा । आणिक कळिकाळा दमेना ॥२७॥ जप तप अनु-ष्ठान । नलगे जिवासी रे बंधन । आणिक न करावें साधन । पहावे चरण विठोबाचे ॥२८॥ देवा सांगे वसुंधरा । मी नभियें सप्तसा-गरा । स्थावर जंगमादि सारा । नाहीं भार तयाचा ॥२९॥ ज्यासी नावडे विठ्ठल वीरु । त्याचा मज भार थोरु । त्यासी नरकीं होय थारु । तो असुर प्राणिया ॥३०॥ ऐसा हा पंढरपुरपति । जीवंतु असतां देतो मुक्ति । मेलिया देतो ब्रह्मप्राप्ति । दोहींकडे सौरस ॥३१॥ येरं प्राणियां कष्ट थोर । परि तें न भरे उदर । मेलिया । यम किंकर । अष्टौप्रहर जाचिती ॥३२॥ ऐसा हा कैलासींचा राणा । गिरीजे स्कंदा सांगे खुणा । तुह्मी आणिक मंल नेणां । या पांडुरंगावांचुनी ॥३३॥ विठ्ठल विठ्ठल म्हणतां । तुटती महापातकचळथा । विष्णुदास नामा विनवीं संतां । सावधान व्हा जी ह्मणतसे ॥३४॥