भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुळसीविण ज्याचें घर । तें तंव जाणावें अघोर । तेथें वसती यम किंकर । आज्ञा आहे म्हणोनी

tulasivin jyachen ghar | ten tanv janaven aghor | tethen vasati yam kinkar | adnya ahe mhanoni

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुळसीविण ज्याचें घर । तें तंव जाणावें अघोर । तेथें वसती यम किंकर । आज्ञा आहे म्हणोनी ॥१॥ तुळसी वृंदावन ज्याचे धरी। त्यासी प्रसन्न श्रीहरी । तें वर्जिलें यमर्किकरीं । आज्ञा आहे म्हणोनी ॥२॥ तुळसीवृंदावना । जे करिती प्रदक्षणा । अंत्त-काळां होतां स्मरण । जन्ममरण नाहीं नामा ह्मणे ॥३॥