भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझिये चरणीं असती दोनी भाव । तरीच हा जीव नरककुंडीं

tujhiye charanin asati doni bhav | tarich ha jiv narakakundin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुझिये चरणीं असती दोनी भाव । तरीच हा जीव नरककुंडीं ॥१॥ बोल बोले एक मनीं असे आणिक । तरी तयासी देख दोनी बाप ॥२॥ तुजविणा सुख आणिकांचें मानी । तरी मज जननीज दोनी देवा ॥३॥ नामा म्हणे माझा सत्याचा साहाकारी । आस मी न करी आणिकांची ॥४॥