भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझिया पायांचें प्रमाण हेंज माझें । चरण कमळ तुझे विसंबेना

tujhiya payanchen praman henj majhen | charan kamal tujhe visambena

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुझिया पायांचें प्रमाण हेंज माझें । चरण कमळ तुझे विसंबेना ॥१॥ संसाराच्या गोष्टी कीट जाले पोटीं । रामकृष्ण कंठीं माळ घाल ॥२॥ दुरोनियां देखें गरुडाचें वारिकें । गोपाळा सारिखें चतुर्भुज ॥३॥ नामा म्हणे विठो जन्मजन्मांतरीं । ऋणि करुनि करीं घेई मज ॥४॥