भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझिया नाम्यानें बळी देउनि चित्त । जन्मोनियां आप्त केलें मज

tujhiya namyanen bali deuni chitta | janmoniyan apta kelen maj

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुझिया नाम्यानें बळी देउनि चित्त । जन्मोनियां आप्त केलें मज ॥१॥ इष्ट मित्र बंधु जननी जनक । सर्वव मीच एक करूनि ठेला ॥२॥ ऐसी याची करणी अजोनि नेणसी । बाळ माझे म्हणसी चाळविलें ॥३॥ प्रेमाचें लाघव लाउनि माझ्या पायीं । बांधलें ह्रदयीं धरोनियां ॥४॥ वृत्तिसहित मन लाविलें राखण । केलें जीवें जतन मजलागीं ॥५॥ उचंबळले नयन अंतरींच्या अनुरगें । रात्रंदिवस जागे मन माझ्या ठायीं ॥६॥ बोले चाले परी लक्ष मजवरी । बाहेरी भीतरीं मज देखें ॥७॥ सर्व सुख गुणा रूपा देउनि मिठी । आणि निर्गुंणीं हिंपुटी होऊं नेदीं ॥८॥ न मागे न घे न धरी सोय संसाराची । कल्पना देहींची मावळली ॥९॥ ऐसें येणें मज विश्वासी गोंविलें । सर्वत्र लाविलें मजचिकडे ॥१०॥ निर्गुणीं हा नामा न सोडी सर्वथा । सांपडला आतां एकरूपा ॥११॥