भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझिया चरणाची न संडी मी आस । मग होत गर्भवास कोटिवरी

tujhiya charanachi na sandi mi as | mag hot garbhavas kotivari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुझिया चरणाची न संडी मी आस । मग होत गर्भवास कोटिवरी ॥१॥ हेंचि मज द्यावें जन्मजन्मांतरीं । वाचे नरहरी नाम तुझें ॥२॥ कृपेचें पोसणें मी गा येक दिन । माझा अभिमान न संडावा ॥३॥ नामा म्हणे मज चाड नाहीं येरे । इतुकेंचि पुरे केशिराजा ॥४॥