भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझें तुज सांकडें पडलें थोर कोडें । तें करी माजीवडें ब्रह्मार्पण

tujhen tuj sankaden padalen thor koden | ten kari majivaden brahmarpan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुझें तुज सांकडें पडलें थोर कोडें । तें करी माजीवडें ब्रह्मार्पण ॥१॥ ब्रह्म हरी ध्याई मन ठेवीं ठायीं । विठठलाच्या पायीं दिननिशीं ॥२॥ अनुभवग्रहणीं विठठल निशाणी । घडेल पर्वणी नित्यकाळ ॥३॥ नामा म्हणे सुघड मन करी वाड । इंद्रियांची चाड धरुं नको ॥४॥