भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझें प्रेम माझे ह्रदाय आवडी । चरण मी न सोडी पांडुरंगा

tujhen prem majhe hraday avadi | charan mi na sodi panduranga

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुझें प्रेम माझे ह्रदाय आवडी । चरण मी न सोडी पांडुरंगा ॥१॥ कशासाठीं शीण थोडक्याकारणें । काय तुज उणें होय देवा ॥२॥ चंद्र चकोराचा पुरवी सोहळा । काय त्याच्या कळा न्यून होती ॥३॥ नामा म्हणे मज अनाथा सांभाळी । ह्रदयकमळीं स्थिर राहे ॥४॥