भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझें निजसुख तुजपाशीं आहे । विचारूनि पाहे मनामाजीं

tujhen nijasukh tujapashin ahe | vicharuni pahe manamajin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुझें निजसुख तुजपाशीं आहे । विचारूनि पाहे मनामाजीं ॥१॥ विवेक वैराग्य शोधुनियां पाहे । तेणें तुज होय ब्रह्मप्राप्ती ॥२॥ ज्ञानाचा प्रकार सहजची जाला । अहंभाव गेला गळोनियां ॥३॥ खेचर विसा म्हणे जेथें ओंकार निमाला । सहजचि जाला ब्रह्ममूर्ती ॥४॥