भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझें गुणनाम ऐकतां श्रवण नाराध्ये । अवलोकन करित नयन नाराध्ये

tujhen gunanam aikatan shravan naradhye | avalokan karit nayan naradhye

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुझें गुणनाम ऐकतां श्रवण नाराध्ये । अवलोकन करित नयन नाराध्ये । पूजन करितां कर नाराध्ये । ऐसी नाराणुक द्यावी कमळापती ॥धु०॥ नरहरि या नामें उदंड । केव्हांही नसावें रिकामें तोंड । खांदीं सतत करंडा वाहे । मस्तकीं अखंड निर्माल्य राहे । नेत्रीं आनंदजळ वाहे । यामध्यें देवा झणें कांहीं उणें होय ॥१॥ तुझेनि प्रसादें जठर पोसिलें । चरणोदकें तृष्णाहरण केलेंज । नामें नृत्य करितां मन हें निवालें । दंडवत घालितां श्रम हरले ॥२॥ गता शयनीं विसर न द्यावा श्रीरामा । यापरी निश्चित परमात्मा । तूं आलिया निवारिसी श्रमा । ऐसें केशिराजा विनवितो नामा ॥३॥