भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझे पायीं माझ्या मनें दिली बुडी । इंद्रियें बापुडीं वेडावलीं

tujhe payin majhya manen dili budi | indriyen bapudin vedavalin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुझे पायीं माझ्या मनें दिली बुडी । इंद्रियें बापुडीं वेडावलीं ॥१॥ आतां विषयसुख जाणावें कवणें । जाणोनि भोगणें कवणें स्वामी ॥२॥ देह सहज स्थिति राहिले निष्काम । ह्रदयीं सदा प्रेम ओसंडत ॥३॥ नामा म्हणे देवा भक्तजनवत्सला । क्षण जीवावेगळा न करींज मज ॥४॥