भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझे चरणीं घालीन मिठी । चाड नाहीं रे बैकुंठीं

tujhe charanin ghalin mithi | chad nahin re baikunthin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुझे चरणीं घालीन मिठी । चाड नाहीं रे बैकुंठीं ॥१॥ सर्वभावें गाईन नाम । सखा तूंचि आत्माराम ॥२॥ नित्य पाय वंदिन माथा । तेणें नासे भवभय व्यथा ॥३॥ रूप न्याहाळीन द्दष्टीन । सर्व सुखें सांगेन गोष्टी ॥४॥ दीनानाथा चक्रपाणी । दासी जनी लावी ध्यानीं ॥५॥