भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझे चरणीं चित्त रंगलें अनुरागें । बुह्जन्मीं वियोगें शिणलें होतें

tujhe charanin chitta rangalen anuragen | buhjanmin viyogen shinalen hoten

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुझे चरणीं चित्त रंगलें अनुरागें । बुह्जन्मीं वियोगें शिणलें होतें ॥१॥ आलाळलें पोळलें तापत्रयीं पीडिलें । तृष्णें विभांडिलें नानापरी ॥२॥ काम क्रोध लोभ दंभ मद मत्सर । इहीं निरंतर जाजावलें ॥३॥ बुडतिया अवचटें लाभे पैं सांगडी । ते जीवें न सोडी तैसें जालें ॥४॥ नामा म्हणे केशवा तूं कृपेचा सागर । झणीं माझा अव्हेर करिसी देवा ॥५॥