भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझाचि अहंकार तुजचि नाडील। मागुता मांडील संसारु हा

tujhachi ahankar tujachi nadil| maguta mandil sansaru ha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुझाचि अहंकार तुजचि नाडील। मागुता मांडील संसारु हा ॥१॥ सांडी सांडी मोहो विषय टवाळ । वाचेसी गोपाळ उच्चारी रे ॥२॥ सर्व हे भुररे मायेचें घरकुलें । अहंकारें नाथिलें नानायोनी ॥३॥ नामा म्हणे भजन हरीचें करीन । नित्य ते सेवीन चरनरज ॥४॥