भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुज गीतीं गातां न येसी पांडुरंगा । प्रेमेंचि दडूं गा पायांपाशीं

tuj gitin gatan na yesi panduranga | premenchi dadun ga payampashin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुज गीतीं गातां न येसी पांडुरंगा । प्रेमेंचि दडूं गा पायांपाशीं ॥१॥ वांकडें तिकडें जैसें आलें तैसें । गावया उल्हास उगवला ॥२॥ त्याचि भरें तोंडा आलें तें बोलतों । नाम मुखीं घेतों अखंडित ॥३॥ तुझा म्हणवितों सांभाळावें देवा । नामया केशवा सर्वकाळ ॥४॥