भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुह्मां हित करणें आहे । सेवा राघोबाचे पाय

tuhman hit karanen ahe | seva raghobache pay

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुह्मां हित करणें आहे । सेवा राघोबाचे पाय ॥१॥ दुष्टबुद्धि दुरी करा । तोडा अविद्येचा थारा ॥२॥ करा तुमचें मन । तुह्मां जवळी नारायण ॥३॥ नामा ह्मणे दृढ धरा । तारी निर्वाणीं चाकरा ॥४॥