भजनी मालिका
← भजनांकडे परत

तृणाचिया लोभेम गायी गेल्या दुरी । पाचारी मुरारी नामें त्यांचीं

trunachiya lobhem gayi gelya duri | pachari murari namen tyanchin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तृणाचिया लोभेम गायी गेल्या दुरी । पाचारी मुरारी नामें त्यांचीं ॥१॥ चंद्रभागे गंगे भागीरथी यमुने । येईं ताम्रपर्णे धांवोनियां ॥२॥ सरस्वती प्रवरे कालिंदी नर्मदे । येईं तुंगभद्रे धां-वोनियां ॥३॥ देवाजीच्या शब्द ऐकोनियां कानीं । येताती धांवोनी नामा म्हणे ॥४॥