भजनी मालिका
← भजनांकडे परत

तोडीं हें बिरडें मोह ममता आधीं । विषय बाधा कधीं गुंफो नको

todin hen biraden moh mamata adhin | vishay badha kadhin gumpho nako

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तोडीं हें बिरडें मोह ममता आधीं । विषय बाधा कधीं गुंफो नको ॥१॥ असे घराश्रमीं भजे सर्वांभूतीं । मी माझें पुढतीं म्हणों नको ॥२॥ तूं तंव लटिका आलासी कोठुनि । मी माझें म्हणोनि म्हणतोसी ॥३॥ नामा म्हणे मूळ राम परब्रह्म । जगाचा विश्राम त्यासी भजे ॥४॥