भजनी मालिका
← भजनांकडे परत

ठांईहूनि जातीं उखळें उडताती । मस्तकीं पडताती येवोनियां

thanihuni jatin ukhalen udatati | mastakin padatati yevoniyan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ठांईहूनि जातीं उखळें उडताती । मस्तकीं पडताती येवोनियां ॥१॥ पाटे वरवंटे वसुपात्रालागीं । जीव त्या प्रसंगीं येता झाला ॥२॥ घाबरे दुर्जन पळाया पाहत । आडव्या ठाकत बाजा पुढें ॥३॥ जानवें तुटलें पंचांग फाटलें । धोतरही गळालें ढुंगणाचें ॥४॥ पृष्ठीवरी होती बदबदां मार । तेथून सत्वर पळता झाला ॥५॥ आयुष्याची बाकी कांहीं उरली होती । ह्मणोनी श्रीपति सोडी त्यातें ॥६॥ नामा ह्मणे जीव घेऊनि पळाला । मथुरेसी आला कंसापाशीं ॥७॥