भजनी मालिका
← भजनांकडे परत

तेहतीस कोटींची केली सोडवण । तो हा राम जपून धरा वेगीं

tehatis kotinchi keli sodavan | to ha ram japun dhara vegin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तेहतीस कोटींची केली सोडवण । तो हा राम जपून धरा वेगीं ॥१॥ राघवाचें नाम वाचेसी उच्चारा । निजाचा सोयरा रामचंद्र ॥२॥ सागरीं ह्या शिळा तारिल्या अवलीळा । ब्रह्मयाची बाला उद्धरिली ॥३॥ रावण कुंभकर्ण विदारिले बाणीं । दिधली राजधानी शरणागता ॥४॥ वाल्मिक भविष्य कथूनियां गेला । रामें पवाडा केला तिहीं लोकीं ॥५॥ नामा म्हणे रामनाम हें दुर्लभ । शिव स्वयंभ हेंचि जपे ॥६॥